banana price today agrowon
Video

Turmeric Market Price: हळदीचे दर स्थिर; तसेच काय आहेत केळी, तूर आणि डाळींबाचे आजचे बाजारभाव

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण केळी, तूर, डाळिंब, हळद आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

banana price: केळीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई दिसून येत आहे. केळीची बाजारातील आवक कमीच आहे. सध्या केळीला सरासरी १५०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तुरीचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून दबावात आले आहेत. सरकारची तूर खरेदी बंद झाल्यानंतर दर हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी झाले. सध्या तुरीला बाजारात ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. डाळिंबाला बाजारात सध्या चांगला उठाव आहे. बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे डाळिंबाचे दर तेजीतच आहेत.सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीचे दर मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. बाजारातील हळदीची आवकही काहीसी मंदावली आहे. सध्या हळद १२ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीतच आहेत. शेवगा आजही ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT