Delayed tur procurement agrowon
Video

Tur procurement delay: तूर खरेदीला मुहूर्त सापडेना, शेतकरी आर्थिक अडचणीत

केंद्र सरकारने किंमत समर्थन योजनेतून (पीएसएस) आत्तापर्यंत १ लाख ३१ हजार टन तुरीची हमीभावाने खरेदी केली असून देशात ८९ हजार २१९ शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी (ता.१३) संसदेत सांगितलं. ,मग राज्यात तूर खरेदीची स्थिती काय आहे..? केंद्रीय कृषिमंत्रालयाचा दावा काय आहे..? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया..

Team Agrowon

महाराष्ट्रात तुरीच्या खरेदीला गती मिळालेली नाही. बहुतांश खरेदी केंद्राला खरेदीचा मुहूर्त लागलेला नाही. तसेच बारदाना तुटवडा आणि माल साठवण्यासाठी गोदाम पुरेसे नाहीत. काही ठिकाणी नोंदणीमध्ये अडचणी आल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात तुरीची विक्री करावी लागत आहे. तुरीचा प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु राज्यातील खुल्या बाजारात मात्र तुरीला प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार २०० दरम्यान दर मिळत आहे. राज्यात १२ लाख टन तुरीचं उत्पादन झालं. केंद्र सरकारने १०० टक्के खरेदी परवानगी दिली आहे. परंतु राज्य सरकार मात्र पहिल्या टप्प्यात २ लाख ९७ हजार टन तुरीची खरेदी करणार आहे. त्यामुळे एकूण उत्पादनाच्या केवळ २५ टक्केच खरेदी करण्यात येणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकरी तूर खरेदीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT