monsoon update agrowon
Video

Monsoon 2025: राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज

Monsoon Update: माॅन्सूनने अंदमानला धडक दिल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला. पोषक हवामान असल्याने माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांत आणखी काही भागात वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

Team Agrowon

Rain Alert: माॅन्सूनने मंगळवारी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेटांचा काही भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात प्रगती केली होती. मात्र आज माॅन्सूनचा मुक्काम त्याच भागात होता. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालाच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यातील काही भागात मागील ४ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडली आहेत. तसेच काही ठिकाणी पिकांनाही फटका बसत आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT