Maharashtra monsoon alert agrowon
Video

Monsoon Update: ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

monsoon 2025: माॅन्सून आज मुंबई, पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झाला. माॅन्सूनच्या पावसाने मुंबईसह पुणे जिल्ह्यात दाणादाण केली. पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Team Agrowon

rain red alert: देशात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून महाराष्ट्रात तो यंदा ११ दिवस आधीच दाखल झाला आहे. आज मान्सूनने मुंबई, पुणे आणि सोलापूरसह राज्याच्या आणखी काही भागात प्रवेश केला. यामुळे मुंबई व पुण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत काही भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. काल महाराष्ट्रात आगमन केल्यानंतर मान्सूनने आज मुंबईपर्यंत मजल मारली. राज्यासह बंगळूरू, कर्नाटकमधील काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, आसाम आणि मेघालयाच्या काही भागांत मान्सूनने विस्तार केला आहे. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असून, हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा व सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. उद्याही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT