namo shetkari scheme agrowon
Video

PM Kisan: राज्य सरकारचा निर्णय; नव्या योजनेत करणार गुंतवणूक

विधानसभा निवडणुकीत ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करण्याची केलेली घोषणा महायुती सरकारने बासनात गुंडाळली आहे. पीकविमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे भांडवली गुंतवणुकीसाठी पाच वर्षांसाठी २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील वाढीवर फुली मारल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

Team Agrowon

पीएम किसान’ या केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची योजना महायुती सरकारने केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील ही योजना अद्याप सुरू आहे. या योजनेत आणखी तीन हजार रुपये वाढवून देण्याचे आश्वासन भाजपसह महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आले होते. तसेच शेतीसंदर्भात अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. एक रुपयातील पीकविम्याचा ढोल बडवून झाल्यानंतर आता पुन्हा नव्याने जुनी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एक रुपयांच्या पीकविम्यापोटी कंपन्यांना द्यावा लागणारा अतिरिक्त हप्ता भांडवली गुंतवणुकीसाठी वळविण्याची उपरती सरकारला झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पीकविमा कंपन्यांना सहा हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले. आता तेच पैसे भांडवली गुंतवणुकीसाठी वापरू असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासोबतच महायुतीने नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करू असे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनालाही हारताळ फासला आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी झालेल्या बैठकीत या वाढीव निधीला विरोध करण्यात आला. हीच रक्कम भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या योजनेतून देता येईल. नमो शेतकरी आणि पीक विम्यातून भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT