soybean market agrowon
Video

Soybean Sowing: सोयाबीनची पेरणी यंदा शेतकरी कमी करण्याची शक्यता

soybean market: सोयाबीनपेक्षा मका आणि उसापासून परतावा चांगला मिळाल्यामुळे खरिप हंगाम २०२५ मध्ये शेतकरी सोयाबीन पेरणी कमी करण्याची शक्यता आहे. सोयाबीनऐवजी शेतकरी मका आणि उसाच्या पिकाला पसंती देण्याचा विचार करत आहेत.

Team Agrowon

मागील तीन वर्षांपासून सोयाबीनचे दर कमीच मिळत आहेत. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. यंदा तर हमीभावापेक्षा १० ते २० टक्के कमी भाव मिळाला. त्याच वेळी मका आणि ऊस पिकांमधून तुलनेने चांगला परतावा मिळाल्यामुळे २०२५ च्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता सोयाबीनऐवजी मका व ऊस या पिकांकडे वळण्याचा विचार करत आहेत. खरीप हंगामात देशातील एक महत्त्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र, यावर्षी लागवड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात खाद्यतेलाच्या आयातीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे राजेंद्र जाधव यांनी राॅयटर्समध्ये लिहिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सोयाबीन हे प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रातील पीक असून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख उत्पादक राज्ये आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT