soybean market agrowon
Video

Soybean Rate: सोयाबीनच्या नव्या हंगामातही दरावर दबाव राहण्याची भीती

Global Soybean Market: चीन आणि अमेरिकेतील व्यापार युध्दाला तात्पुरता विराम मिळाला. नव्या हंगामात अमेरिकेतील उत्पादन घटीचा अंदाज असल्याने सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. मात्र चीनच्या मार्केटमध्ये ब्राझीलकडून मिळत असलेली स्पर्धा आणि नव्या हंगामावर जाणवत असलेले व्यापार युध्दाच्या ढगामुळे दरवाढीवर मर्यादा आहे. यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.

Team Agrowon

Soybean Production: अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युध्दाला सोमवारी ९० दिवसांसाठी विराम मिळाला. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या मालावर १४५ टक्क्यांऐवजी ३० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. तर चीनने आमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर १२५ टक्क्यांऐवजी १० टक्के शुल्क लागू केले. हे शुल्क ९० दिवसांसाठी असेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन निर्यातदार अमेरिका आणि सर्वात मोठ्या आयातदार चीनमध्ये तोडगा निघाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. आता चीन अमेरिकेकडून जास्त सोयाबीन खरेदी करेल असे वातावरण तयार झाल्याने सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा दिसून आली. मात्र दर सुधारणेवर मर्यादाही आहेत.चीनच्या बाजारात अमेरिकेच्या सोयाबीनला ब्राझीलच्या सोयाबीनशी स्पर्धा करावी लागत आहे. चीनने आता अमेरिकेच्या सोयाबीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. मात्र ब्राझीलच्या सोयाबीनवर आयात शुल्क नाही. त्यामुळे ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त पडत आहे. तसेच ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाले आणि पुरवाठाही चांगला आहे. तसेच ब्राझीलच्या सोयाबीनच्या किमतीही कमी आहेत. चीनन आतापर्यंत गरजेच्या ७० टक्के सोयाबीन ब्राझीलमधून घेतले आहे. अमेरिकेच्या सोयाबीनवर चीनमध्ये शुल्क असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, अशी भीती अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT