low-water fruit tree care agrowon
Video

Fruit Crop Management: फळबागेतील ओलावा टिकवण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय

वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो. सध्याच्या काळात फळबागेतील ओलावा टिकवून ठेवण्याची गरज आहे. तरच उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येईल.

Team Agrowon

फळबागेतील ओलावा टिकवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. उन्हामुळे जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाष्पीभवन होते. यासाठी फळझाडांच्या बुंध्याभोवती सेंद्रिय किंवा प्लास्टिक आच्छादन करावे. हे आच्छादन तण नियंत्रित करते आणि ओलावा टिकवते. पानांवरील बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी पांढऱ्या खडूची किंवा केओलीनची फवारणी करावी. पोटॅशियम नायट्रेट २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास झाडे तग धरतात. उताराच्या जमिनीत पाणी अडवण्यासाठी अर्धवर्तुळाकार बांध करावेत. व्ही ब्लेडच्या साहाय्याने आंतरमशागत करून ओलावा टिकवता येतो. पॉलिमरचा वापर केल्यास जमिनीत अधिक काळ ओलावा राहतो. उन्हामुळे झाडांची खोडे तडकू नयेत म्हणून ती बोर्डोपेस्टने झाकावीत. संध्याकाळी पाणी दिल्यास झाडांना जास्त ओलावा मिळतो. योग्य काळजी घेतल्यास कमी पाण्यातही फळबाग टिकवता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT