Heat Wave agrowon
Video

Heat Wave: राज्यात उष्णतेचा पारा वाढला; अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यातील पावसाचे वातावरण दूर झाले. तसे बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. विदर्भात तुलनेत तापमान अधिक दिसत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे प्रमाण वाढले आहे. दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.

Team Agrowon

राज्यात मागील दोन आठवडे वादळी पावसाचे वातावरण होते. त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतारही झाले. सरासरी तापमान काहीसे कमी झाले होते. पण आता पावसाचे वातावरण निवळले. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढला. विदर्भात भंडारा आणि गोंदिया वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला. तर अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्येही तापमान ४३.४ अंशावर पोचले होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांशी भागात तापमान ४० अंशाच्या दरम्यान पोचले.  हवामान विभागाने आज अहिल्यानगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिला. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला. तसेच सातारा आणि बीड जिल्ह्यात उद्या ऊन जास्त राहण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT