Ginger market agrowon
Video

Raisin price: सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी तर हरभरा, आले, सोयाबीन आणि कापसाचे दर काय? जाणून घ्या आजचे बाजारभाव

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हरभरा, आले, बेदाणा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

सरकारच्या धोरणामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम आहे. आज बाजारात हरभरा ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २५० रुपये दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील चढ उतार सुरुच आहेत. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ९.७६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड २८५ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० रुपयांवर होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज दुपारपर्यंत ६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT