Rainy weather in Maharashtra agrowon
Video

Rain Alert: राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता

राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काही भागात काहीसा कमी झालेला दिसतो आहे. राज्यातील पावसाचे वातावरण कायम आहे. पुढील ५ दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Team Agrowon

राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान असल्याने काही प्रमाणात उन्हाचा तीव्रपणा कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदीया, गडचिरोली येथे तीन दिवस विजांसह हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, भंडारा, अमरावती येथेही ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल. धाराशिव, लातूर, नांदेड येथे दोन दिवस, सोलापूरमध्ये तीन दिवस आणि सांगली, कोल्हापूरमध्ये रविवारी आणि सोमवारी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT