Two-week monsoon break agrowon
Video

Monsoon 2025: पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता

Monsoon slowdown: यंदा मॉन्सूनने अपेक्षेपेक्षा वेगाने आगमन करत देशात लवकरच पदार्पणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

monsoon break: आज सलग तिसऱ्या दिवशी मॉन्सूनने एकाच भागात मुक्काम केला. सध्या मॉन्सूनची सीमा मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागांपर्यंत पोहोचली आहे. जरी हवामान पोषक असले तरी मॉन्सूनची पुढील वाटचाल पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांतच होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ६ ते १२ जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागात पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्राचा विचार करता ३१ मे ते ५ जून या कालावधीत कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक, मध्य महाराष्ट्रात सरासरीइतका तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ ते १२ जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात पावसात खंड पडणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसात तूट पडणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT