Rain alert in Maharashtra agrowon
Video

Paus Andaj: राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही असह्य होत आहे.

Team Agrowon

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता कायम आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे उन्हाचा चटकाही असह्य होत आहे. हवामान विभागाने आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, नंदूरबार, धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारीही पावासाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवस पावसाला पोषक हवामान आहे. भंडारा जिल्ह्यात मंगळवारी, चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी, वर्धा जिल्ह्यात बुधवारी, यवमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि बुधवारी काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT