weather update agrowon
Video

Monsoon Rain: राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

rain alert Maharashtra: राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

माॅन्सूनची आजही राज्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. मागील दोन दिवसांप्रमाणेच माॅन्सून एका ठिकाणीच थांबलेला आहे. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. अनेक भागांमध्ये हलक्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाची तीव्रता थोडी कमी झालेली आहे. पुढील पाच दिवसांत, विदर्भ वगळता इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही पावसाचा जोर मर्यादित राहील, पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

Marathwada Climate Monitoring: मराठवाड्यात हवामान अभ्यास, संशोधन केंद्राची गरज

Agricultural Pump Theft: दुष्काळात तेरावा महिना; कृषिपंपांसह केबलची चोरी

SCROLL FOR NEXT