vidarbha konkan rain alert agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

maharashtra rain update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी हवामान विभागाने पुढील पाच दिवस काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशभरही पोषक हवामानामुळे मॉन्सूनने आणखी काही भागांत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

Team Agrowon

rain alert: आज हवामान विभागाने विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्हे, तसेच धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT