Rain alert agrowon
Video

Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटकाही असह्य होत आहे.

Team Agrowon

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तर भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी  विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. वाशीम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT