Maharashtra weather forecast agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

monsoon update: माॅन्सूनचा प्रवास मागील ९ दिवसांपासून रेंगाळलेला आहे. तर राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

rain update: माॅन्सून २९ मेपासून एकाच जागेवर आहे. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल झाली नाही तसेच पावसाचा जोरही कमी झाला. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार, तर इतर ठिकाणी हलक्याप्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस विदर्भात अशाच स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला गेला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील पाच दिवस काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cadre Structure Cancellation: आकृतिबंध अखेर रद्द; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Government Inquiry: माजी सचिवांची चौकशी होणार

Pulses Market: अकोला बाजरात तूर, हरभरा दरवाढीचा कल

Heavy Rain Alert: उत्तर महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

SCROLL FOR NEXT