Video

Rain Alert: राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आजही अकोल्यात सर्वाधिक तापमान होते. तर मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून अकोल्यात आजही सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीत ४३ अंश तापमान होते. विदर्भातील अनेक भागांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून मात्र हवामान कोरडे राहील. कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगलीमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बीडमध्ये आज, तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये उद्या आणि शुक्रवारी पावसाचा अंदाज आहे. अमरावती, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT