weather update agrowon
Video

Rain Alert: मराठवाडा, विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज

राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावासाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही दोन दिवसांमध्ये पावसाला पोषक हवामान होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

विदर्भात आजपासून काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गोंंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज आहे. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली. अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवमाळ जिल्ह्यात पुढील ४ ते ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यात उद्यापासून तीन ते चार दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT