Rain alert agrowon
Video

Unseasonal Rain: राज्यातील ६ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. तसेच राज्यात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Team Agrowon

राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. तसेच राज्यात आज वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, वीजांसह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला. तर १७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजा, वादळी वारे, हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.  विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, विजांसह ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बीड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, ठाणे पालघर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, वीजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात सोलापूर आणि सांगली वगळता सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाची आहे.      

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT