Onion Production Agrowon
Video

Onion Production: गादीवाफ्यावरील कांदा लागवड तंत्र

Kharif Onion: गादीवाफ्यावर कांदा रोपांची लागवड करण्यापुर्वी जमिनीची मशागत करताना मध्यम भारी जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

Team Agrowon

Onion Fertilizer Management: गादीवाफे १२० सेंटीमीटर रुंद, १५ सेंटीमीटर उंच आणि सोईनुसार लांब बनवावेत. या गादीवाफ्यांवर दोन्ही बाजूंनी एक फुटाचे अंतर सोडून ठिबक सिंचनाच्या दोन किंवा तीन नळ्या टाकाव्यात, जेणेकरून वाफ्यावर सर्व भागांमध्ये समान सिंचन होईल. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा संच चालू करून सरासरी ४ ते ५ सेंटीमीटर खोलीपर्यंत ओल राहील इतके पाणी द्यावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपाची मुळे कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी आणि कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावणामध्ये दोन तास बुडून ठेवावीत. यामुळे कीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. रोप लागवड करताना दोन ओळींतील अंतर १५ सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर १० सेंटीमीटर ठेवावे. पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT