Government clarification on milk scheme agrowon
Video

Milk Subsidy: दूध उत्पादकांसाठी नवीन योजना नाही; सरकारचं संसदेत स्पष्टीकरण

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंमत समर्थन मूल्य योजना किंवा अनुदान देण्याचा मुद्दा विचारधीन नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी बुधवारी (ता.१२) लेखी उत्तरात दिली. याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत..

Team Agrowon

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंमत समर्थन मूल्य किंवा अनुदान देण्याचा विचार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी संसदेत स्पष्ट केले. दूध खरेदी-विक्रीचं नियोजन सरकार करत नसून, सहकारी आणि खाजगी दूध संघ उत्पादन खर्च व मागणीनुसार दर ठरवतात. सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना विक्री दराच्या ७०-८०% दर देतात. त्यामुळे किमान आधारभूत किंमत किंवा अनुदान योजना लागू केली जाणार नाही. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत दुग्धजन्य पदार्थांचा ५% वाटा असून, २०२२-२३ मध्ये दूध उत्पादन ११.१६ लाख कोटींवर पोहोचल्याचेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT