Monsoon Update Agrowon
Video

Monsoon Update: राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

Heavy Rain: दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक आहे.

Team Agrowon

Weather Update: जुलै महिन्यात तापमान कसे राहू शकते? याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच जुलै महिन्यात पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे. तर पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे, असेही श्री. खुळे यांनी स्पष्ट केले . ला-निना स्थिविषयी बोलताना श्री. खुळे यांनी सांगितले की, सध्या एन्सो तटस्थ असून ऑगस्ट महिन्यात ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी. आतापर्यंत आयओडी धन होता. परंतु पुन्हा तटस्थेकडे झुकत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Renewal: परभणीत पीककर्ज नूतनीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल कमी

Rural Water Supply: मुरबाड ग्रामीण भाग टँकरमुक्तीच्या दिशेने

Agriculture Conference: माटुंग्यात हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया परिषद

Sunflower Farming: सूर्यफूल पिकाच्या शेतीने समृद्धीकडे वाटचाल

Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT