Early monsoon India 2025 agrowon
Video

Monsoon in Kerala: सरासरी वेळेच्या आधीच माॅन्सून देशात देखाल होणार

माॅन्सून देशात यंदा वेळेआधी दाखल होणार आहे. माॅन्सून केरळमध्ये २७ मे रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. पोषक हवामान असल्याने माॅन्सून वेळेच्या आधी देशात येणार आहे. तसेच हवामान विभागाने यंदा माॅन्सून काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे.

Team Agrowon

माॅन्सून केरळमधून देशात प्रवेश करतो. तसेच केरळमध्येच माॅन्सून जमिनीवर येतो. माॅन्सून केरळमध्ये कधी येतो त्यावरून देशातील वाटचालही ठरते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर माॅन्सून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करतो. केरळमध्ये माॅन्सून दाखल होण्याची सरासरी वेळ १ जून आहे. मात्र, मागील ५ वर्षांमध्ये माॅन्सून ३ वर्षे सरासरी वेळेपेक्षा उशीरा देशात दाखल झाला. तर २ वर्षे माॅन्सून वेळेच्या आधी देशात आला. यंदाही सरासरी वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी माॅन्सून येणार आहे. माॅन्सूची केरळमध्ये आगमनाची वेळ ६ परिमानांवरून ठरविली जाते. त्यात वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावर पूर्व मोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण, प्रशांत महासागरातील वायव्य भागातील समुद्रसपाटीवरील हवेचे दाब, दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारे किरणोत्सर्ग, ईशान्य हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह आणि इंडोनेशियातील हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह, हे परिमाण वापरले जाते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT