Skymate Monsoon agrowon
Video

Skymate Monsoon: मॉन्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना साथ देणार

'स्कायमेट' या खाजगी हवामान अंदाज संस्थेने २०२५-२६ च्या मॉन्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी स्कायमेट वर्तवली आहे. स्कायमेटने देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे

Team Agrowon

राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाने आग ओकायला सुरूवात केली आहे. तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या मॉन्सून हंगामात पावसाने साथ दिल्याने आगामी मॉन्सूनच्या हंगामाबद्दल शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग लवकरच मॉन्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर करेल, अशी शक्यता आहे. आत्ता मात्र स्कायमेटने मॉन्सून हंगामात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाही मॉन्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगल्या मॉन्सून बरसण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात पुरेसा तर पश्चिम घाट केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. तसेच उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT