Thunderstorm alert agrowon
Video

Pre monsoon Rain: माॅन्सूनचा मुक्काम अरबी समुद्र, श्रीलंकेच्या किनारी भागात

Weather Alert: माॅन्सूनने काल अरबी समुद्रापर्यंत मजल मारत मालदीवच्या काही भागासह श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली होती. मात्र आज माॅन्सूनने याच भागात मुक्काम केला. तसेच राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील काही दिवस राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Team Agrowon

Rain Update: मॉन्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रापर्यंत मजल मारली होती. तसेच मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानच्या कोमोरिन भागातही माॅन्सूनची प्रगती झाली होती. सोबतच श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत माॅन्सून पोचला होता. आज मात्र माॅन्सूनने याच भागात मुक्काम केला होता. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक हवामान आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT