monsoon 2025 agrowon
Video

Monsoon Update: माॅन्सूनने श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला

Rain Alert: माॅन्सून केरळमध्ये रविवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. माॅन्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामानही आहे. तसेच राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Team Agrowon

Monsoon 2025: माॅन्सूनने आज पुढे चाल करत श्रीलंकेचा बहुतांशी भाग काबीज केला. माॅन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. मालदीव आणि कोमोरिनच्याही आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही माॅन्सूनने पुढे चाल केली. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच माॅन्सून पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागातही माॅन्सून दाखल होईल. बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील १२ तासात या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशात तुलनेत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT