monsoon update agrowon
Video

Monsoon Update: माॅन्सूनने अंदमान निकोबार बेट समूह व्यापला

Monsoon 2025 Update: मॉन्सूनने आज प्रगती करत संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला. तसेच बंगालचा उपसागर तसेच मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागात प्रगत करत माॅन्सूनने श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली. इकडे राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

IMD Forecast: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे माॅन्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेच्या आधीच सुरु झाली. माॅन्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीव- भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरिन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर एक दिवस त्याच जागी मुक्काम केला होता. आज मॉन्सूनने पुढे चाल केली. माॅन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्रात, मालदीव आणि कोमोरीन भागात, बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती केली. तसेच अंदमान आणि निकोबर बेट समूह संपूर्ण व्यापला. माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे.  त्यामुळे पुढील दोन दिवसांत माॅन्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी ४० ते ६० किलोमिटर प्रतितास वेगाने वारेही वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT