Sugarcane water management agrowon
Video

Sugarcane Water Management: उसातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

मार्च ते जून या काळात उसाला पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो, यामुळे उसाची वाढ आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.जास्त तापमानामुळे उसावर काय परिणाम होतात? आणि त्यावर उपाय काय करायचे? याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.

Team Agrowon

शेतामध्ये ऊस १२ ते १८ महिने उभा असतो. उसाला नेमकं वाढीच्या काळातच बदलत्या हवामानाला तोंड द्यावं लागतं, त्यामुळे ऊस उत्पादनात चढ-उतार आढळून येतात. उसाच्या मुळांची कार्यक्षमता कमी होते. पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाशसंश्लेषण मंदावते. पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात. पानातील हरितद्रव्याच प्रमाणही घटत. उसात धशीचे प्रमाण वाढते. कांड्यांची लांबी व जाडी कमी होते आणि उसाच वजन घटत जातं.खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपा च्या उसाच्या संख्येत घट होते.

पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपाय

लांब सरी, एका आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीने पाणी द्यावे. लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाळ्यातील अंतर कमी ठेवावे. २५ टक्के जास्त पोटॅश खत द्यावे. दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश + दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी. एक टक्का  मल्टिन्यूट्रियंट द्रवरूप खतांची एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Issues: उद्दिष्टात घट, गोंधळात वाढ

Local Varieties Management Workshop: आज ‘वनामकृवि’त स्थानिक वाणांच्या व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

Maharashtra Irrigation Conference: बेलेवाडी- काळम्मात उद्यापासून महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित

Banana Crop Shredding Machine: यंत्राद्वारे केळी खोडाची कुट्टी

Pipeline Irrigation Policy: शेतीला बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठ्याचे धोरण

SCROLL FOR NEXT