Rain Alert agrowon
Video

Rain Alert: मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

ढगाळ हवामानामुळे राज्यातील बहुतांशी भागात तापमानात घट दिसून आली. आजही अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होते. तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला.

Team Agrowon

राज्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली असून, आजही अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यांसाठी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून पावसाळी वातावरण निवळेल आणि तापमान वाढण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. राज्यातील तापमान सरासरी ३७ ते ३८ अंशांदरम्यान राहिले असून, पुढील काही दिवस चढ-उतार सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT