Crop Insurance agrowon
Video

New Crop Insurance: राज्य सरकारचा निर्णय; पीक विमा योजनेत मोठे बदल

पीक विमा योजनेत सर्वाधिक भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रीगर रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याच्या सुधारित पीक विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता.२९) मंजुरी दिली. यामुळे शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळणार आहे. मात्र लाडक्या बहीणीमुळे अडचणीत आलेल्या राज्य सरकारचा जवळपास अडीच ते ३ हजार कोटींचा विमा वाचेल. हा पैसा लाडक्या बहीणीसाठी वळवला जाईल, अशी माहीती आहे.

Team Agrowon

विमा योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांना पेरणीच न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळत होती. यापैकी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधूनच जास्त भरपाई मिळते. तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई खूपच कमी मिळते. पण आता पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईच मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे ट्रीगर वगळण्यात आले. तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई देखील मिळणार नाही. सुधारित पीक विमा योजनेत केवळ एका ट्रीगरमधून भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.  
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पीकविमा योजनेविषयी २० मार्च रोजी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत पीक विमा योजनेत बदल करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यात बैठकीत शासनाला पीकविमा योजनेत काही बदल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने पीक विमा योजनेत बदल करून सुधारित विमा योजनेला मंजुरी दिली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT