Maharashtra weather update agrowon
Video

Unseasonal Rain: राज्यात बहुतांश भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता

राज्यात अवकाळीच्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर येथे हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. वाशीम, नागपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या परभणी, हिंगोली येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा येथे गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. शनिवारी नांदेड, धाराशिव येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर गोंदीया, वर्धा येथे गारपीट होण्याची शक्यता आहे. रविवारीही राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT