monsoon update agrowon
Video

Monsoon Rain: कोकणात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

monsoon 2025: मॉन्सूनने आज देशातील अनेक भागांमध्ये आपली मजल मारली आहे. गुजरात पार करून आता मॉन्सून राजस्थानमध्ये दाखल झाला असून, पुढील २ ते ३ दिवसांत आणखी भागांमध्ये त्याची प्रगती होणार आहे. हवामान विभागाने विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवसांत दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Team Agrowon

Maharashtra monsoon update: राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सून सक्रिय आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही मुसळधार सरी पडत असून, कोकणात पुढील पाच दिवस काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही मुसळधारेचा इशारा आहे. खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आज व उद्या पावसाचा जोर राहील. तर मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT