Animal Care agrowon
Video

Animal Vaccination: पावसाळ्याआधी जनावरांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लसी

जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळवणं शक्य होत. कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक लसीकरण करण केव्हाही फायद्याचच आहे. सध्याच्या काळात जनावरांना कोणत्या प्रतिबंधात्मक लसी द्यायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.

Team Agrowon

पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यातच अशक्त जनावरे घातक आजारांना लगेच बळी पडतात. काही आजारांमध्ये जनावरं दगावण्याचीही शक्यता असते. संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण गरजेच आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण फायदेशीर ठरत. पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या-मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण कराव.आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी लसीकरण करण अत्यंत गरजेचं आहे. कारण लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करण फायद्याच ठरत नाही. महत्वाच म्हणजे लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनाशकाची मात्रा द्यावी. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा. त्यामुळे लसीकणाचा योग्य फायदा होतो. यासोबतच जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. त्यामुळे टोचलेल्या लसीमुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम मिळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bt Cotton Seeds Rate : २०२६ च्या खरीपसाठी बीटी कपाशी बियाण्यांचे दर 'जैसे थे'; केंद्र सरकारचा निर्णय

ZPFMS Shutdown: झेडपीएफएमएस बंद; वित्तीय व्यवहार ठप्प

Water Conservation: ऐंशीव्या वर्षीही पाणी प्रश्‍नाला भिडलेले खानापूरकर!

Seed Festival: जालना, अकोला, जळगाव येथे बियाणे महोत्सव

Agriculture Electricity: २०२७ पर्यंत सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिवसा वीज, राजस्थान सरकारची महत्त्वाची योजना

SCROLL FOR NEXT