Flood Management Agrowon
Video

Flood Management: पुरस्थितीत जनावरांची कशी काळजी घ्याल?

Animal Health: पुराच्या वेळी पाण्याबरोबरच अनेक टाकाऊ पदार्थ गोठ्याच्या परिसरात येतात. जनावरांच्या खाद्यात असे घटक येणार नाहीत,याची काळजी घ्यावी.

Team Agrowon

Animal Diseases: पुराचे पाणी साठल्यामुळे काही ठिकाणी डास,किटकांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे कडुलिंबाचा पाला व शेणाच्या गोवऱ्या पेटवून धूर करावा. गोठ्यात जनावरांची गर्दी टाळावी. गर्दीमुळे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांमध्ये आजाराचे संक्रमण वाढेल. पूरामुळे जनावरांमध्ये जंत, गोचीड, गोमाशा यासारख्या परोपजीवींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन आणि गोचीड निर्मूलन करून घ्यावे. गोठ्यातील सर्व जनावरांची व्यवस्थित पाहणी करून आजारी जनावरांना पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. जनावरांना आहारातून खनिज मिश्रणे, हिरवा आणि वाळलेला चारा द्यावा. या काळात गाभण जनावरांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT