Rain Update Agrowon
Video

Rain Update: विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील पालघर आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Weather Update: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुजरातच्या किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रापासून बिहार पर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २) सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT