monsoon update agrowon
Video

Monsoon Rain: राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon update: अरबी समुद्रातील शाखा तब्बल १५ दिवसांपासून एका भागातच स्थिर आहे, तर बंगालच्या उपसागरातील शाखा देखील १३ दिवसांपासून काहीशी ठप्प आहे. मात्र, हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल हवामान तयार होत आहे. यामुळे येत्या १४ जूनपर्यंत माॅन्सून मध्य भारतात तसेच पूर्व भारतातील काही भागांत प्रगती करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Team Agrowon

rain alert: महाराष्ट्रातील अनेक भागांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांत येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह विजा आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत गुरुवार आणि शुक्रवार, तर सातारा जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार हे दिवस विजेच्या कडकडाटासह अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता दर्शवली आहे.कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गुरुवार ते शनिवार आणि रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार व शनिवार हे दिवस विजा आणि मेघगर्जनेसह अतिजोरदार पावसाचे राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT