rain alert agrowon
Video

Monsoon Rain: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Monsoon Update: राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Team Agrowon

rain alert: मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण पोषक असल्यामुळे, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी काही भागांत प्रगती करेल. कर्नाटकाचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही मान्सून पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरातील शिल्लक भाग, ईशान्य भारतातील काही राज्ये, तसेच पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांमध्ये देखील याच कालावधीत मान्सून पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगड, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: पावसाने उभ्या पिकांचे नुकसान

Pune Rain Update: खडकवासला परिसरात विक्रमी १०४ मिमी पाऊस

Political Crime Case: आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट

Agriculture Department Crackdown: ‘एचटीबीटी’ रोखण्यासाठी भरारी पथके

Revenue Department Services: महसूल विभागाच्या सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत बंद

SCROLL FOR NEXT