Rainfall alert agrowon
Video

Monsoon Update: मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Monsoon Arrival: माॅन्सूनने कालपासून एकाच जागेवर मुक्काम केला. तरीही माॅन्सन रविवारपर्यंत केरळमध्ये पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला.

Team Agrowon

मॉन्सूनची आज कोणतीही पुढील वाटचाल झाली नाही. मॉन्सून सध्या त्याच भागात स्थिर आहे. मात्र, मॉन्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पूरक असून, येत्या २ ते ३ दिवसांत मॉन्सूनची वेगाने वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मॉन्सून रविवारीपर्यंत केरळपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांवर प्रगती करेल. तसेच, मॉन्सून मालदीव आणि कोमोरिनच्या उर्वरित भागात प्रवेश करेल आणि त्याचबरोबर लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू व ईशान्य भारताच्या काही भागांमध्येही दाखल होईल. बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागातही मॉन्सूनचा विस्तार होण्याचा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण व गोव्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो पुढील ३६ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पूरक हवामान आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT