rain forecast Maharashtra agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ, कोकणातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता

monsoon alert: माॅन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्यामुळे येत्या ४८ तासांत विदर्भासह देशातील इतर काही भागांत माॅन्सूनचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

Team Agrowon

rain alert: पुढील दोन दिवसांत माॅन्सून विदर्भात आणखी काही भागांत आणि छत्तीसगड, ओडिशातील काही भागांतही सरकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच दिवस काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांत येत्या तीन दिवसांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील इतर काही भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT