Crop Insurance agrowon
Video

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात १६२० कोटी २२ एप्रिलपर्यंत जमा

राज्यातील २९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरअंतर्गत विमा भरपाई जमा होत आहे. या दोन ट्रीगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार १७८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. यापैकी १ हजार ६२० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर १ हजार ५५८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Team Agrowon

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल. स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरुच आहे. त्यामुळे भरपाईची रक्कम वाढत आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या दोन ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT