Fadnavis speech on soybean cotton tur buying agrowon
Video

Devendra Fadnavis: विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीबाबत काय म्हणाले? ते जाणून घ्या

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी म्हणजे आज सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात आकडेवारी देत पाठ थोपटून घेतली. सोयाबीनची खरेदी सर्वाधिक करण्यात आल्याचं सांगितलं. त्यासाठी २०१६-१७ सोयाबीन खरेदीचे संदर्भ दिले. राज्यात विक्रमी ११ लाख २१ हजार ३८५ टन सोयाबीनची ५६२ केंद्रावरून खरेदी केल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

Team Agrowon

सोयाबीन उत्पादकांना यंदाच्या हंगामात खुल्या बाजारात ४ हजार ८९२ रुपयांपेक्षा कमी म्हणजे हमीभावाच्या कमी किमतीत सोयाबीन विकावं लागलं. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना प्रतिक्विंटलला १ हजार ते दिड हजाराचा फटका शेतकऱ्यांना बसला. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं सोयाबीन उत्पादकांची धास्ती घेऊन सोयाबीन खरेदीला मान्यता देण्यात आली. पण वास्तवात मात्र सोयाबीन खरेदीचा बाजाराला आधार मिळाला नाही. कापूस खरेदीसाठी १२४ कापूस खरेदी केंद्र सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यातून १३७ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याचं म्हणाले. त्यात ५० हजार क्विंटलच्या वर जिथं कापूस असेल तिथं खरेदी केंद्र देण्याचं सांगितलं. परंतु वास्तवात मात्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्राला कुलूप लावण्यात आलेलं आहे. त्यासाठी कापसाची गुणवत्ता चांगली नसल्याचं कारण सीसीआयकडून देण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT