Chana Rate agrowon
Video

Chana Rate: हरभऱ्याचा भाव पोचला हमीभावाच्या वर

देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावात सुधारणा दिसून आली. हरभऱ्याचे भाव हमीभावाच्या पुढे पोचले आहेत. बाजारात सध्या हरभरा ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. भाव वाढल्याने सरकारची हमीभावाने खरेदी मात्र नगण्य झाली आहे. तसेच हरभरा दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Team Agrowon

सरकारने हरभऱ्याची विक्रमी आयात झाल्यानंतरही हरभऱ्याच्या दरातील सुधारणा कायम आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हरभऱ्याचा भाव ४ हजार ८०० ते ५ हजारांच्या दरम्यान होता. मात्र हरभऱ्याची मळणी जशी पूर्ण होत गली तसे हरभरा उत्पादनाचे चित्रही स्पष्ट होत गेले. त्यामुळे उत्पादन यंदा कमीच राही, अशी चर्चा बाजारात आहे. सरकारच्या अंदाजानुसार, यंदा देशात ११५ लाख टन हरभरा उत्पादन होईल. मात्र बाजारात यापेक्षा कमीच उत्पादन राहील, अशी चर्चा आहे. हरभरा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज असला तरी यंदा हरभऱ्याचा एकूण पुरवठा कमीच राहणार आहे. देशातील हरभऱ्याचा शिल्लक स्टाॅक यंदाच्या हंगामात खूपच कमी होता. त्यामुळे उत्पादनात काहीशी वाढ झाली तरी पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला नाही. याचा आधार दराला मिळत आहे. बाजारातील हरभरा आवक जसजशी कमी होत आहे. तसे दरातही सुधारणा होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT