Chana MSP Registration agrowon
Video

Chana Procurement: हमीभावाने हरभरा खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात

राज्य सरकारने अखेर आज हरभरा खरेदी जाहीर केली. हमीभावाने सरकारला हरभरा विक्रीसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली, तर प्रत्यक्ष खरेदी १ एप्रिलपासून सुरु होईल, असे पणन विभागाने सांगितले. सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयांनी कमी आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी किमान हमीभावाने हरभरा विकावा, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

Team Agrowon

राज्य सरकारने अखेर हरभरा खरेदी जाहीर केली असून, नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदी १ एप्रिलपासून सुरू होईल, असे पणन विभागाने सांगितले. सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी हमीभावाने विक्रीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मागील महिनाभरापासून हरभऱ्याचे दर हमीभावाच्या खाली गेले आहेत. पिवळा वाटाणा आयात वाढवल्यामुळे हरभऱ्याची मागणी घटली आणि त्याचा परिणाम दरावर झाला. सरकारने यंदा हरभऱ्याचा हमीभाव ५,६५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे, पण सध्या बाजारात तो ४,९०० ते ५,००० रुपयांना मिळत आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकात खरेदी लवकर सुरू झाली होती, पण महाराष्ट्रात परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. अखेर सरकारने खरेदीला मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बाजारातील आवक वाढल्याने दरावर दबाव आला आहे. अभ्यासकांनी शेतकऱ्यांना हमीभावानेच हरभरा विकण्याचा सल्ला दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT