Banana Cultivation Management agrowon
Video

Banana Cultivation: केळी बागेतील रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना कराल?

राज्यातील महत्त्वाचे फळपीक म्हणून केळी पीक ओळखले जाते. महाराष्ट्रात केळी लागवड मुख्यतः जून-जुलै महिन्यांत केली जाते. मृग बाग लागवडीची वेळ काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मृग बाग केळी लागवड ही मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात लागवड करणे टाळावे.केळी पिकाची लागवड ही गादीवाफ्यावर करावी.

Team Agrowon

महाराष्ट्रात केळी लागवड प्रामुख्याने जून-जुलै महिन्यांत केली जाते. जून - जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला मृग बाग असं म्हणतात. मृग बाग लागवडीतील केळी घड उन्हाळी हंगामात काढणीस तयार होतात. विविध कारणांमुळे मृग बागेचं नुकसान जास्त प्रमाणात दिसून येतं. केळ बागेत प्रामुख्याने करपा म्हणजेच सिगाटोका या बुरशीजन्य आणि कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यापैकी कुकुंबर मोझॅक म्हणजेच सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हा रोग लागवडीच्या सुरुवातीला येतो. नुकसान जास्त होत असल्यामुळे रोग नियंत्रणासाठी रोप पूर्ण उपटून नष्ट करावं लागतं. विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केळी बागेची लागवड करतानाच योग्य ती खबरदारी घेणं गरजेच आहे. रोग टाळण्यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीसच लागवड करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यास झाडांची आणि घडांची वाढ चांगली होते. लागवडीचे अंतर राखणेही महत्त्वाचे आहे. उंच वाणांसाठी 1.75×1.75 मीटर, तर बुटक्या वाणांसाठी 1.5×1.5 मीटर अंतर योग्य आहे. कंद निवडताना ते निरोगी असावेत आणि प्रक्रिया करून लागवड करावी. ऊतीसंवर्धित रोपे वापरताना ती मजबूत व ४-५ पाने असलेली असावीत. सजीव कुंपणासाठी शेवरीची लागवड बागेभोवती करावी. योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास केळी बागेपासून अधिक उत्पादन मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT