Ajit Pawar agrowon
Video

Maharashtra budget 2025: अजित पवारांचा अर्थसंकल्प, निवडणुकीत दिलेली आश्वासने हवेत?

अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. लाडकी बहिणांना २१०० रुपये हप्ता करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे महायुतीला महिलांनी साथ दिली. परंतु निवडणुकीनंतर मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. त्यावरून राज्यातील राजकारणही तापलं आहे. महिलांमध्ये नाराजी तर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आज पाहायला मिळाली. मग आता महायुती आश्वासनं पूर्ण कधी करेल? याचीच माहिती घेऊया या व्हिडिओमधून...

Team Agrowon

लाडकी बहीण योजेसाठी ३२ हजार कोटी आतापर्यंत खर्च करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. या योजनेसाठी वार्षिक ४६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवरती पडेल अशी चर्चा सुरु होती. त्यात आता २१०० रुपये प्रमाणे राज्यातील २.५३ कोटी लाडक्या बहिणींना दिले तर त्यासाठी वार्षिक ६४ हजार कोटी रुपयांचा भार सरकारच्या तिजोरीवर पडेल असं जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT