Loan Waiver Agrowon
Video

Loan Waiver: कर्जमुक्तीसाठीचे ५ हजार ९७५ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत?

Ambadas Danve: दानवे यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचे ५ हजार ९७५ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत.

Team Agrowon

Farmer Loan: दुष्काळ मदत, अवकाळी-अतिवृष्टीचं अनुदान, पीकविमा, कर्ज पुरवठा, शेतकरी आत्महत्या यावर बुधवारी विधानपरिषदेत दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सरकार घोषणा करतं पण शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत, सरकारनं घोषणा केलेल्या नुकसान भरपाई अनुदान आणि मदतीचे अजूनही १० हजार २२ कोटी ६४ लाख रुपये रखडून पडल्याचा आरोप दानवे यांनी केला. (व्हिडिओ दानवे) यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित होते. दानवे यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचे ५ हजार ९७५ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. एवढंच नाही तर राज्यात अवकाळी, अतिवृष्टी, पुर, वादळी वारे याचा फटका बसून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सरकारनं घोषणा केल्या. पण मदत मात्र शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. राज्यात मार्च ते मे २०२३ च्या दरम्यान अवकाळी पाऊस झाला. सरकारनं मदत जाहीर केली पण त्यातील ५५१ कोटी अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT