Hybrid Nepiyar Fodder Crop Agrowon
चारा पिके

संकरित नेपिअर चाऱ्याची लागवड कशी करावी ?

संकरित नेपिअर गवताची लागवड एकदा केल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याच्यापासून उत्पादन घेता येते.

Team Agrowon

संकरित नेपिअर (Hybrid Nepiyar) हे उंच वाढणारे बहुवार्षिक चारा पिक (Fodder Crop) आहे. याचे खोड बाजरीच्या खोडासारखे असते कारण संकरित नेपिअर हे आफ्रिकन बाजरी आणि नेपियर गवताचे संकर आहे. संकरित नेपिअर गवताची लागवड एकदा केल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याच्यापासून उत्पादन घेता येते.

जमिनीची निवड

लागवडीसाठी कसदार, मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. एक खोल नांगरट करून तीन ते चार कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

सुधारित वाण

लागवडीसाठी फुले जयवंत (आर बी एन १३), फुले गुणवंत (आर बी एन २११-१२), बायफ-११ या सुधारित वाणांची निवड करावी.

पेरणीची वेळ

खरीपामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान पेरणी करावी. एका जागी एक ठोंब लावल्यास अठरा हजार पाचशे ठोंबे प्रति हेक्टरी लागतात.

खत व्यवस्थापन

प्रती हेक्टरी २० ते २५ टन शेणखत २२५ किलो नत्र, ७५ किलो स्फुरद, ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ७५ किलो नत्र, ३७.५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रती हेक्टर पेरणीपूर्वी द्यावे. तीस किलोमीटर 37.50 ३० किलो पालाश बांधणीच्या वेळी (चार कापण्या नंतर) द्यावे. प्रत्येक कापणी नंतर ३० किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावे. प्रत्येक कापणी नंतर खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन

जमिनीचा प्रकार आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या ठरवाव्यात. सर्वसाधारणपणे १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापणी

संकरित नेपियर हे बहुवार्षिक पिक असल्याने पहिल्या कापणीनंतरच्या पुढील कापण्या पाच ते सहा आठवड्याच्या अंतराने करत राहाव्यात. असे केल्याने पिकाची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. पहिल्या कापणीतून मिळणारे चाऱ्याचे उत्पादन कमी असते. मात्र त्यापुढील कापण्यामध्ये उत्पादन वाढत जाते.

स्त्रोत ः (कृषिदर्शनी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT