मुरघास कसा तयार करावा ? 
चारा पिके

Murghas Making : मुरघास कसा तयार करावा ?

बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे

मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवत पिके; तसेच द्विदल पिके - जसे की लुर्सन, चवळी, बरसीम, गवार, वाल आणि पावटा यांचा वापर करावा.

एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे. द्विदल पिकांच्या चाऱ्यांमध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण जास्त असते.

प्लॅस्टिक बॅग सायलेज : प्लॅस्टिक बॅगा ५ किलो, १० किलो, ५० किलो, १०० किलो, ५०० किलो, १००० किलो अशा प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या बॅगा वारंवार वापरात येऊ शकतात. हाताळायलाही सोप्या असतात. ड्रम सायलेज : प्लॅस्टिक ड्रमची क्षमता १०० ते ३०० लिटरपर्यंत असते. ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मुरघास तयार करावयाचा आहे आणि साखळी पद्धतीने वापर करावयाचा आहे, त्या ठिकाणी ही पद्धत उपयुक्त आहे. मुरघास तयार करण्याची प्रक्रिया :

  • चाऱ्याचे १ ते २ इंच लांबीचे कुट्टी यंत्राच्या साह्याने तुकडे करून घ्यावेत.
  • मुरघासासाठी तयार केलेल्या खड्ड्यामध्ये प्रथमतः प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरावा. त्यावर चारापिकाच्या कुट्टीचा थर पसरवावा.
  • इतर पद्धतींमध्ये चारापिकाची कुट्टी बॅगेत किंवा ड्रममध्ये किंवा बांबूच्या चौकटीत व्यवस्थित भरायला सुरवात करावी.
  • प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी युरिया एक किलो, मीठ एक किलो, उसाची मळी किंवा गूळ दोन किलो आणि खनिज मिश्रण एक किलो १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा.
  • कुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. जर हवा आत दबून राहिली, तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत कमी दर्जाची होऊ शकते.
  • खड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून त्यावर पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेल्या गवताचा थर पसरून आच्छादन करावे. या आच्छादनावर ५ इंचांच्या मातीचा थर द्यावा, जेणेकरून हवाबंद स्थिती व्यवस्थित होईल.
  • हवाबंद केलेला मुरघास हा ४० ते ५० दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.
  • सर्वसाधारणपणे दिवसाला प्रत्येक गाईस २० किलो मुरघास द्यावा. मुरघासाचे प्रमाण दूध देण्याच्या क्षमतेवर व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
  • संपर्क : डॉ. मनोजकुमार आवारे,(०२०) २६९२६२४८ (बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

    Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

    SCROLL FOR NEXT