cultivation of Cashewnuts   
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

अशी करा काजू लागवड...

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. लागवडीसाठी वेंगुर्ला- १, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-६, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-८ या जातींची कलमे निवडावीत. लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत ७ मीटर बाय ७ मीटर किंवा ८ मीटर बाय ८ मीटर अंतर ठेवून ६० बाय ६० बाय ६० सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यात दोन घमेली शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. कलमांची लागवड पाऊस स्थिरावल्यानंतर करावी. कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे. संपर्क ः ०२३६६ - २६२२३४ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT